पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य करून मानसिक छळ केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य करून मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका विरुद्ध भा.द.वि कलम ३७७, ४९८ए,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने पिडित महिला सोबत ओळख निर्माण करुन दिनांक १० जुलै २०२२ रोजी लग्न केले. लग्नानंतर पिडीत महिला आरोपीचे घरी नांदण्यासाठी गेली असता सुरुवाती पासून आरोपीने महिलेचा भयंकर मानसिक, शारिरीक, आर्थिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्या पहिल्या पतीकडून पैसे घेवून ये नाहीतर तुला घटस्फोट देईल अशी धमक्या देवू लागला.

पिडीत महिलेने आरोपीला मी पैसे आणणार नाही असे बोलले असता आरोपीने फिर्यादीला बेदम मारहाण केली. त्याबाबत पिडीत महिलेने
मोहम्मदवाडी पोलिस चौकीमध्ये पती विरूद्ध १ ऑगस्ट २०२२ रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या गोष्टीचा राग येवून पतीने रात्रीचे वेळेस पिडीत महिलेच्या इच्छा नसताना देखील आरोपी हा पिडीत महिलेला मोबाईल मध्ये व्हिडिओ दाखवून जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत होता.

हे घाणेरडे कृत्य केल्यामुळे पिडीत महिला वारंवार आजारी पडत होती तरी देखील आरोपी हा पिडीते सोबत जबरदस्तीने कृत्य करीत होता. तसेच पिडीतेने नकार दिल्याने आरोपी हा तलाक देण्याच्या धमक्या देवून वारंवार आरोपी हा सोबत अनैसर्गिक कृत्य करीत असे,परत पिडीत महिलेला मारहाण केली म्हणून पिडीत महिलेने १०० नंबर वरती पोलिसांना फोन केला असता पोलीस घरी आल्यावर आरोपी हा पिडीत महिलेला सोडून पळून गेलेला.

सुरुवातीला पोलिसांनी पिडीत महिलेची तक्रारीची दखल घेतलेली नाही म्हणून पिडीत महिलेला अॅड. साजिद ब.शाह, अॅड. हबीब खान, अॅड. अक्रम बेपारी यांच्या मार्फत वानवडी पोलिस ठाणे पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३७७, ४९८ए,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.अँड. साजिद ब. शाह, अॅड. हबीब खान, अॅड. अक्रम बेपारी हे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here