पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, २२ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथील धांडेकर नगर लेन नं. ३ मधील वहिवाटी रोडवरती फिर्यादी महिला थांबली असताना आरोपी राम परवेझ झा,
अलोक राम परवेझ झा,रविन्द्र राम परवेझ झा, जितेन्द्र राम परवेझ झा यांनी फिर्यादी महिलेला जातिवाचक बोलून शिवीगाळ करुन तसेच फिर्यादी यांचे पतीस हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.
फिर्यादी या भांडणे सोडविण्यासाठी गेला असता आरोपीनी फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली होती.
आरोपी यांच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५४, १४३, १४७,३२३, ५०६, ५०४, ३४ सह अनुसुचित जाती आणि जमाती अधिनियम १९८९ कलम ३(१) (आर) कलम ३(१) (एस) कलम ३(२) (व्ही.ए) प्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता.
सदर प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. साजिद ब.शाह व अॅड. हबीब खान यांनी बाजू मांडून युक्तीवाद केला. शिवाजीनगर न्यायालयाने सर्व ८ आरोपींना या प्रकरणात जामिन मंजुर केला असल्याचे ॷॅड साजिद शहा यांनी पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.