कोंढव्यात अनधिकृत बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला!

0
Spread the love

दोन जण जख्मी झाल्याचे वृत्त.अग्निशमन व पालिकेची वाहने घटना स्थळी दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिथे नजर जाईल तिथे इमारतींचे बांधकामे सुरू असल्याचे नागरिकांनी उघड डोळ्यांनी दिसत असले तरी पुणे महानगर पालिकेतील अधिका-यांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली गेली आहे?

कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांन संदर्भात “पुणे सिटी टाईम्स” वारंवार आवाज उचलला असून अनेक वेळा बातम्या सुध्दा प्रसारित केल्या आहेत. परंतु माननियांकडून याला खतपाणी घातले जात असल्याची चर्चा नागरिकांकडून सुरू आहे.

कोंढव्यातील शिवनेरी गल्ली नंबर ३ येथे एका इमारतीचे स्लॅब कोसळल्याची बातमी वार्या सारखी पसरल्याने बघ्याची गर्दी झाली होती. सदरील सोनिया श्रीमई क्लासेस या इमारतीच्या ६ व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम कामगारांकडून सुरू होते.

काम करताना अचानक स्लॅब कोसळला, स्लॅब कोसळल्याने दोन कामगार जखमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींना सांगितले.काम पुर्ण झालेल्या जुन्या इमारतीवर नव्याने काम केले जात होते.

उठसूट कोणीही इमारतींचे मजले वाढवत असून याला कोणाचीही भिती राहिलेली नाही. यात विशेष म्हणजे पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहिले आहे.

कधी मोठ्ठी जिवितहानी झाली असती तर याची जबाबदारी कोणाची असली असती? पुणे महानगर पालिकेतील अधिका-यांनी वेळेतच अनधिकृत बांधकामांना लगाम घातले नाही तर पुढील होणा-या अपघाताला मनपातील अधिकारी जबाबदार असतील,‌असे काहि जणांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here