आमदाराकडून पोलिस शिपाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना साखळे, तर पोलिस शिपाईचे गॉडफादर भाजपाचे आमदार?
संदीप साळवेच झाला वानवडी पोलिस ठाण्याचा किंग?
रेस कोर्सच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवांची हिस्सेदारी कोणाकोणाची?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील वानवडी पोलिस ठाण्यात चालयं तरी काय? वानवडी पोलिस ठाणेचा एक पोलिस शिपाईची खुपच चर्चा सध्या वानवडी पोलिस ठाण्यात चालू आहे. संदीप साळवे या पोलिस शिपाईची बदली विनंती अर्जावरून २४ एप्रिल २०२३ रोजी दुसऱ्या पोलिस ठाण्यात म्हणजे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. परंतु तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी कार्यमुक्त न केल्याने साळवे याने वानवडी पोलिस ठाण्यातच पुन्हा बसतान बसवले.
बसतान बसवल्या नंतर मोठ्या प्रमाणावर रेसकोर्स मध्ये आर्थिक व्यवहार चालू झाल्याची चर्चा सध्या वानवडी पोलिस ठाण्यातच सुरू आहे. तर नव्याने रूजू झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे व तत्कालीन जॉईंट सीपी संदीप कार्णिक यांच्याकडे समाजिक संघटनांनी लेखी तक्रार केल्याने ऍडिशनल सीपी संदीप कार्णिक यांनी साळवे, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रूजू का झाला नाही या बाबतीत माहिती घेतली होती. तर त्यावेळी भारती विद्यापीठ पोलिसांनी अहवाल सादर केला होता की, संदीप साळवे रूजूच झाला नाही.
त्यामुळे संदीप कार्णिक यांनी वानवडी पोलिसांची खरडपट्टी घेत साळवे ला सोडण्यास सांगितले होते.वानवडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्या साळवी ला वानवडी पोलिस ठाण्यातून काही दिवसांपूर्वी कार्यमुक्त करून जावक क्रमांकासहीत ठाणे डायरीत नोंद करून, पोलिस ठाण्याच्या व्हाट्सअप ग्रुप वर कार्यमुक्त केलेले पत्र टाकले होते.
पण दुसऱ्याच दिवशी आमदाराच्या जवळ असलेला साळवे यांनी आमदाराचा राजकीय फायदा घेऊन पोलिस आयुक्तालयातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून बदली थांबवण्याचा खटाटोप केला.आणि त्याला यश देखील मिळाले. पोलिस आयुक्त कार्यालयातील अति वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वानवडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तोंडी आदेश देत, तेही किती पोलिस शिपाईच्या राजकीय दबाव पुढे हतबल आहेत. हे दाखवून देत संदीप साळवे यांना सध्या वानवडी पोलिस ठाण्यातच काम करण्याचा नियमबाह्य परवानाच देऊन टाकला आहे.
एका पोलिस शिपाईच्या पुढे आपण किती हतबल आणि भित्रे आहोत हे वरिष्ठ पोलिसांनी दाखवून दिले आहे. परंतु अजूनही नियमबाह्य थांड माडून बसलेला कर्मचारी आज डिबी रूममध्ये रेसकोर्सचा लाखोंचा आर्थिक व्यवहार करत असल्याची खमंग चर्चा पोलिस ठाण्यातच रंगली आहे.तर साळवे याला पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने साथ दिल्याने सध्या दोघांच्या आर्थिक प्रेमाची चर्चा वर पासून खालपर्यंत ऐकायला मिळत आहे. सर्वांचीच मिली भगत असल्यानेच आपण सभ भाई मिलकर खाए मलाई अशी चर्चा सध्या पोलिस ठाण्यात सुरू आहे. पोलिस आयुक्त सदरील प्रकरण गांभीर्याने घेऊन मिली भगत असलेल्या सर्वांची चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. क्रमक्षा :
कार्यमुक्त केलेल्या कर्मचारी वानवडी पोलिस ठाण्यात अधिकृत का अनधिकृत?
वानवडी पोलिस ठाण्यातून संदीप साळवे याची बदली झाल्याने व त्याला वानवडी पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त केल्याने देखील तो आजरोजीही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रूजू न होता वानवडी पोलिस ठाण्यातून चक्रे फिरवत आहे. मग साळवे हा वानवडी पोलिस ठाण्यातच काम करत असल्याने त्याला मिळणारे पगाराची नोंद भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात होते का? वानवडी पोलिस ठाण्यात? आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात होत नसेल तर वानवडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल का पाठवत नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.