बुधवार पेठेत मटका, पंती पाकोळी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट.
गुन्हेगारांना पोसतयं तरी कोण?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असताना देखील फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस कारवाई करतच नाही.तर समाजिक सुरक्षा विभाग ( सासु) मात्र व्यवस्थित दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. फरासखाना पोलिस ठाण्याचे हाकेच्या अंतरावरच बुधवार पेठ आहे.त्या ठिकाणी लाईनशीर मटका, पंती पाकोळी, अंदर बाहर, बिंगो, काठी, काळा पिवळा, जोमाने सुरू असल्याचा प्रकार सर्व सामान्यांना दिसून येत असला तरी पोलिसांचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहेत.
तसेच फरासखाना पोलिस ठाण्यातवर सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांचे कार्यलय देखील आहेत.परंतु त्यांच्या कानावर देखील सदरील धंद्यांची माहिती गेली असतानाही ते देखील काळा चष्मा परिधान करून बसलेत की काय? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे? दत्त मंदिराच्या डाव्या बाजूने लॉटरीच्या दुकानात सदरील उद्योग चालू असल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या पाहणीत दिसून आले.
तेथे एक नव्हे दोन नव्हे तर एकालाईनीत दहा ते बारा अवैध धंदे दिसून आले आहे. अवैध धंद्यांतून मोठ्या प्रमाणावर मलाई चाखायला मिळत असल्याने गुन्हेगारी व अवैध धंद्ये फोफावली आहेत. एकीकडे पोलिस आयुक्त गुन्हेगारी संपविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी फरासखाना पोलिस गुन्हेगारांना अवैध धंद्यांचा परवाना देऊन त्यांचे पालनपोषण करत असल्याची चर्चा सध्या बुधवार पेठेत ऐकायला मिळत आहे.
तर विषेश म्हणजे अवैध धंद्यांवर वचक रहावा व मुळासकट धंदे बंद व्हावी, असा उददे्श समाजिक सुरक्षा विभागाचा असला तरी आज त्या उददे्शालाच तळा गेला आहे. समाजिक सुरक्षा विभाग असून नसुन खोळंबा झाला आहे. सध्या सासुची भिती संपल्याने सासरे ( अवैध धंद्येवाले) माजलेले दिसून येत आहे.
यावर पोलिस आयुक्तांनी आता कुंडल्या काढून तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे. क्रमक्षा: पुढील बातमी ( कोणाच्या आशिर्वादाने फरासखाना व सासूचे वसुली बहाद्दूर जगत आहे?)