पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंतांनी २० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेची कारवाई,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंतावर लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.आज सोमवारी बंडगार्डन पाणीपुरवठा कार्यालय, बंडगार्डन विभाग येथे कारवाई करण्यात आली आहे.

मधुकर दत्तात्रय थोरात वय ५६, उपअभियंता वर्ग २, व अजय भारत मोरे वय ३७, कनिष्ठ अभियंता अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत.

तक्रारदार यांचा टँकर मार्फत पाणीपुरवठा करणे हा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक असणारे पास मनपा कार्यालयातून घेतले असून प्रत्येक टँकर भरताना १ पास द्यावा लागतो परंतू पास देवून सुद्धा अजय मोरे यानी दर दिवशी ५ पेक्षा जास्त टँकर भरून पाहिजे असल्यास महिना २० हजार रूपयांची मागणी केल्याची तसेच मधुकर थोरात याने तक्रारदार यांचे अनामत रक्कमेचे बील काढण्यासाठी २० हजार रूपये लाच मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली.


सदर तक्रारीची पडताळणी केली असता मधुकर थोरात व अजय मोरे असे दोघांनी २० हजार रूपयांची लाच मागणी करून त्या दोघांनी प्रत्येकी २० हजार रूपये स्वीकारल्यावर त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक संदिप व-हाडे तपास करत आहेत.सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here