पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
कात्रज नवीन बोगद्याजवळ इंडीयन पेटोल पंप समोरील हॉटेल मध्ये जेवणाचे पैसे मागितल्या कारणाने वेटरला मारहाण करून त्याचे अपहरण केल्याचा प्रकार कात्रज येथे समोर आला आहे. त्या प्रकरणी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(१) योगेश सर्जेराव पार, वय – २८, (२) रविंद्र सखाहारी कानडे, वय – ४१, (३) रूपेश अशोक वाडेकर, वय-३८, (४) ओंकार जालिंदर बेंद्रे, वय – ३२, (५) नितीन अशोक वाडेकर, वय – ३२, सर्व राहणार अहमदनगर,
या सर्वांनी फिर्यादी यांचे हॉटेल मध्ये जेवण केल्यानंतर, त्यांचेकडे जेवलेल्या जेवणाचे बिलाची मागणी हॉटेल मधील कामगार (वेटर) याने केल्याचा राग मनात धरुन, त्यास जबरदस्तीने उचलुन मारहाण केली, व जीवे ठार मारण्याच्या उददेशाने, त्यांनी आणलेल्या पांढ-या रंगाची ब्रेझा या वाहना मध्ये जबरदस्तीने उचलुन गाडीमध्ये टाकून नेले,
तर जाताजाता एकजण म्हणाला उदया तुम्हाला त्याची मरणाची खबर येईल असे फिर्यादीस सांगुन वेटर यास शिवीगाळ व मारहाण करुन,त्यास जीवे ठार करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या समक्ष अपहरण केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कर्चे करीत आहेत.