विजेचा शॉक बसलेल्या चिमुकल्याला ससून हॉस्पिटलमधून तीन तासांनंतर औषध उपचारांविनाच माघारी फिरावे लागले; सोशल मिडियावर नेटिझन्सनी केला संताप व्यक्त

0
Spread the love

तुम्हाला खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे असेल तर जा,असा सल्लाही देण्यात आला.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

हडपसर सय्यदनगर येथील एका लहान मुलाला विजेचा शॉक लागून भाजल्याने त्याला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ससून हॉस्पिटलमधून औषध उपचारांविनाच माघारी फिरावे लागल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.विजेचा शॉक बसल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला विनवणी करूनही तीन तास उपचार मिळाले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

“असदची आई बोलताना चा व्हिडिओ “

ससूनमध्ये लहान मुलांचे डॉक्टर नाहीत, ‘डॉक्टरांचा फोन लागत नाही,’ ‘अॅडमिट करा, मग बघू,’ अशी उडवाउडवीची उत्तरे तीन तासांत देण्यात आली. दरम्यान, मुलाची प्रकृती नाजूक होऊ लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पालकांनी दिली.रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी ‘ससून’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतली होती.

मागील बातमी वाचण्यासाठी 👉 कोंढव्यातील विकासकामांचा उडाला फज्जा; पुणे महानगर पालिकेची यंत्रणा सपशेल फेल?

तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. सय्यदनगर येथे आई-वडिलांसोबत राहणारा असद हा ५ वर्षांचा असून शनिवारी घराजवळ खेळत होता. खेळताखेळता वीजपुरवठा करणाऱ्या उघड्या’डीपी’तील वायरला त्याचा हात लागला. त्या

मुळे शॉक बसून तो जखमी झाला.पालकांनी त्याला उपचारासाठी तत्काळ ‘ससून’मध्ये आणले. दुपारी तीन वाजता त्याला आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.दुपारी मुलाची आई आफरीन शेख म्हणाल्या, ‘ससूनच्या आपत्कालीन विभागात लहान मुलांचे डॉक्टर नसल्याचे सांगून अर्धा तास थांबवून ठेवले.

सतत विचारणा केल्यानंतर केसपेपर तयार करण्यासाठी सांगण्यात आले. बराच वेळ झाला, तरी डॉक्टर न आल्याने आठ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये असदला दाखल करण्यास सांगण्यात आले.डॉक्टर नसल्याने तेथेही उपचार झाले नाहीत. नर्सकडून डॉक्टरांना सतत फोन लावण्यात येत होता. त्यानंतर पाच वाजता एक व्यक्ती आली आणि त्यांनी असदचे फक्त फोटो
काढले.

त्यानंतरही तासभर कुणीही डॉक्टर फिरकले नाहीत. तोपर्यंत असद मान टाकू लागला. त्याबाबत विचारणा केली असता, तुम्हाला खासगी हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे असेल तर जा, असा सल्ला देण्यात आला.

असदची स्थिती पाहून आम्ही खूपच घाबरलो होतो. त्यामुळे शेवटी त्याला सय्यदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

ससून रुग्णालयात शनिवारी घडलेल्या या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. त्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली जाईल.डॉ. विनायक काळे, ससून हॉस्पिटल

ससूनमध्ये पाच वर्षाच्या मुलाला दाखल केल्यानंतर तीन तास कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत, ही गंभीर बाब आहे.आम्ही मुलावर उपचार मिळावे म्हणून, ससूनच्या वरिष्ठांनाही फोन केले. मात्र,त्यांनी केवळ पाहतो असे सांगून वेळ मारून नेली.अजहर इनामदार, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here