१२ वाजेपर्यंत लेखी परवानगी असताना मिरवणुकीतील साऊंड १० वाजताच बंद.
लष्कर, समर्थ पोलिसांच्या वादात नागरिकांना संताप?
वाहतूक शाखेने दरवर्षी स्टेज घालणारे मंडळाचे अर्ज घेऊनही शेवटपर्यंत परवानगीच दिली नाही.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
२८ सप्टेंबर २०२३ रोजी मो. पैगंबर साहेंबाची जयंती व गणेश विसर्जन सण एकत्र आल्याने मुस्लिम समाजाने मिरवणुक ( जुलूस) १ ऑक्टोबर रोजी काढण्याचा प्रयत्न केला. आणि मुस्लिम समाजाचा एक मात्र उददे्श हा एकच होता की, शांतता व एकोपा व्हावा आणि दोन्ही सण चांगल्या पद्धतीने साजरी व्हावीत. पुणे शहर पोलिसांनी मिरवणुकीसाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई केल्याने मिरवणुक काढणारी जूलूस मंडळांनी नाराजगी व्यक्त केली. तर वाहतूक शाखेने दरवर्षी स्टेज घालणारे मंडळाचे अर्ज घेऊनही शेवटपर्यंत परवानगी दिली नाही.
पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी २१ सप्टेंबर रोजी गॅजेट काढून २८ सप्टेंबर रोजीच १२ वाजेपर्यंत स्पीकर परवानगी दिल्याने मुस्लिम समाजामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तर याबाबतीत अडचण व वाद उपस्थित होण्यापूर्वी लोकहित फाऊंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख व पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना त्यांच्या वाटसअपवर पत्र देत २८ सप्टेंबरला मिरवणुक निघणार नसून १ ऑक्टोबर रोजी जयंतीची परवानगी १२ वाजेपर्यंत देण्याची मागणी केली होती.
तर त्या संदर्भात अजहर खान व पत्रकार मुजम्मिल शेख यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख व पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात आणून देऊनही पुणे पोलिसांनी मिरवणुकीत आलेल्या भावीकांचा सन्मान न ठेवता मिरवणुकीतील स्पीकर १० वाजताच बंद केले. पोलिसांच्या अश्या वागण्याने मुस्लिम समाजाने रोष व्यक्त केला आहे.
दोन पोलिसांच्या हद्दीच्या नियमावलीत मिरवणुकीत गोंधळ?
समर्थ पोलिस ठाणे व लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दरवर्षी मिरवणुकी जात असतात, दर दरवर्षी कधीही नियमावलीत तफावत पाहायला मिळाली नाही. परंतु लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत परवानगी ही रात्री १२ वाजेपर्यंत, तर समर्थ पोलिसांची परवानगी रात्री १० वाजेपर्यंत. पोलिसांच्या या दुप्पट भुमिकेमुळे पोलिस आणि मंडळे समोरासमोर आली. तर पोलिसांचा आणखीन एक प्रकार समोर आला की, लष्कर पोलिस ठाण्याने स्टेज टाकलेल्या मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकरची परवानगी दिली होती व लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या मिरवणुकीला १० वाजेपर्यंत स्पीकर परवानगी दिली होती. पोलिसांच्या या कृतीमुळे मिरवणुकीतील मंडळाना चांगलाच फटका बसल्याने मंडळानी पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे सिटी टाईम्स व टाईम्स ऑफ महाराष्ट्र ने पोलिस उपायुक्त समर्थना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या १० वाजेपर्यंतच परवानगी आहे. तर त्यांना प्रश्न विचारले असता की, तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी १२ वाजेपर्यंत स्पीकर परवानगी दिलीच कशी? तर त्यांनी त्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांची चुक कबूल केली. परंतु १० नंतर स्पीकर वाजविण्याची परवानगी दिली जाणार नाही असे देखील म्हणाले.दरवर्षी निघणाऱ्या मो.पैगंबर साहेंबाच्या जयंतीत कधीही दोन नियमावली पाहायला मिळाली नाही. परंतु पहिल्यांदाच दोन नियमावली पाहायला मिळाल्याने मुस्लिम समाजाने निषेध व्यक्त केला आहे.