दहिहंडी उत्सवात अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुनित बालन यांना पुणे महानगर पालिकेचा दणका. ३ कोटी २० लाखांची नोटीस.

0
Spread the love

जाहिराती उभ्या केल्या जात असताना पुणे महानगर पालिका झोपा काढत होती का?

पुनित बालन दंडाची रक्कम भरणार का? का न्यायालयात जाणार?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

संपूर्ण पुणे शहरात जिते जाईल तिथे एकच दृश्य पुणेकरांना दिसत होते ते म्हणजे उद्योजक पुनित बालन यांची पाण्याची जाहिरात.त्यावर आता पुणे महानगर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २९८२२५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साइन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ से तरतुदीनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.

तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम, १९९५ चे तरतुदीनुसार आणि उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र. १५५/२०११ सुस्वराज्य फाऊंडेशन विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर मध्ये न्यायालयाने दि. ३१.१.२०१७ रोजीच्या आदेशाचा भंग केलेला आहे.७ सप्टेंबर २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान दहिहंडी उत्सवामध्ये पुणे महानगरपालिकेच्या महापालिका सहायक आयुक्त कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हद्दीत परवाना निरीक्षक यांचेमार्फत समक्ष पाहणी केली असता सार्वजनिक ठिकाणी ८x४ चौ. फुटाचे ऑक्सिरि कंपनीचे अंदाजे २५०० अनधिकृत जाहिरात फलक कोणतीही पुर्वपरवानगी न घेता उभारून विद्रुपीकरण केल्याचे निदर्शनास आले आहे.

सण उत्सव काळामध्ये गणेश उत्सव वगळता सर्व जाहिरातींना शुल्क देय आहे. त्यानुसार सदर अनधिकृत जाहिरात फलकांचे एकुण ८०,००० चौ. फुटाचे र.रु. ४०/- प्रति दिन प्रति चौ. फुटाप्रमाणे दहा दिवसांच ३ कोटी २० लाख वसुलपात्र दंडात्मक रक्कम देय होत आहे.

तरी आपण केलेल्या विना परवाना जाहिरातीपोटी एकूण रक्कम रुपये ३ कोटी २० लाख तरी (अक्षरी तीन कोटी वीस लाख फक्त) दंड (विद्रुपीकरण शुल्क) ही नोटीस प्राप्त होताच २ दिवसाचे आत पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात त्वरीत भरण्याचे व सदर रकमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास विरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व वसुलपात्र रकम मिळकत करातून वसुल केली जाईल असे पुणे महानगर पालिकेने काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here