पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील उपनगर भागातील कोंढव्यात रहिवाशांचा वाहतूक कोंडीत घाम निघत आहे. तासंतास वाहतूक कोंडीत कोंढवाकर अडकत असल्याने नागरिक आता कोंढवा सोडण्याचा विचार करत आहे.आज दि.३ मे २०२४ रोजी फखरी हील ते ज्योती हॉटेल चौक, ते मिठानगर पर्यंत व ज्योती हॉटेल समोरच्या बाजूने जाणारा रस्ता मायफेर सोसायटी, कौसरबागचा मधील रस्ता,
कौसरबाग मस्जिद समोरील रस्ता,लाईफ लाईन हॉस्पिटल,ते वेलकम हॉल पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोंढव्यात होणारी रोजचीच वाहतूक कोंडीतून सुटका करता नाकीनऊ येत आहे.
*कोंढव्यात झाली वाहतूक जाम.. कोंढवाकरांचा निघतोय घामच घाम.. व्हिडिओ.*
मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने पोलिस, राजकारणी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सपशेल फेल झाले आहे. घरातच बस ग बाई, बाहेर जाण्याची करू नको घाई, रोजचीच होतीये वाहतूक जाम, आपलाच निघतोय घामच घाम..
लोकसभा निवडणूक सुरू असताना एकाही उमेदवाराने कोंढव्यातील अवैध बांधकाम,चांगले रस्ते, पाण्याची समस्या, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, अतिक्रमण व इतर रोजच्याच भेडसावणाऱ्या समस्या बाबतीत बोलायला तयार नाही. ही खरीच शोकांतिका आहे.