पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
रस्त्यावर पार्कीग करुन ठेवलेल्या रिक्षांची डिस्क टायर चोरांना मुंढवा पोलीस पोलीसांनी २४ तासाचे आत केले गजाआड केले आहे.मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील स.नं. १२४/२८३, भिमनगर, झोपडपट्टी भाग असून येथील रहीवाशी नागरिक हे रिक्षा चालक, बिगारी काम, मोल मजुरी इत्यादी कामे करुन उपजिवीका भागवितात. सदरचा भाग हा अतिशय दाटी वाटीचा असल्याने वाहने लावण्यास कोणतीही पार्कंग सुविधा नसल्याने रिक्षा व इतर वाहने हे सदर ठिकाणी रोडच्या कडेला पार्क करुन ठेवतात, अशाच प्रकारे दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी रहीवाशी नागरिकांनी आपली रिक्षा ही नेहमी प्रमाणे पार्क करुन ठेवलेल्या असतांना अज्ञात इसमांना एकुण सहा रिक्षांची समोरील तसेच मागील बाजुची एकुण १० डिस्कसह टायर चोरीस गेल्याने मुंढवा पोलीस ठाणेस तक्रार प्राप्त झाल्याने मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ७९/२०२४ भादंवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, यांनी दाखल गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून पाहणी व पडताळणी करुन दाखल गुन्हयाची मोडस,संशयीत इसमांची माहिती काढून तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना आरोपीतांचा शोध घेणे बाबत सक्त सुचना देवून हद्दीत शोध घेणेकामी रवाना केले. आरोपींचा शोध घेत असतांना तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना गुप्त बातमीदारांमार्फत सदरचा गुन्हया करणारे आरोपी हे हडपसर-मुंढवा रोड वरील ब्रिजखाली येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सहा.पोलीस निरीक्षक, राजू महानोर व स्टाफ यांनी सापळा लावून सदर आरोपी १) वाजिद युनूस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे २) झैद जविद शेख, वय २२ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे यांना ताब्यात घेतले.
सदर ठिकाणी दाखल गुन्हयातील चोरीस गेले मालाचे वर्णनाप्रमाणे डिस्क टायर असलेली रिक्षा मिळून आल्याने दाखल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीतांनी चोरी करण्यासाठी वापरलेली १ तीन चाकी रिक्षा, १० डिस्कटायर,१ स्टील टायर खोलण्याचा पाना असा एकुण ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार राकेश बोबडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, आर.राजा, परिमंडळ-५, सहा. पोलीस आयुक्त, अश्विनी राख, यांचे सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस सहा. पोलीस निरीक्षक, राजू महानोर, सहा.पोलीस फौजदार, संतोष जगताप, संतोष काळे, राहुल मोरे, राकेश बोबडे व इतर स्टाफ यांनी केली आहे.