१५ कोटींच्या जमिनीची सव्वा कोटीत विल्हेवाट : वक्फ प्रॉपर्टी घोटाळा,

0
Spread the love

आरोपींचे पोलिसांना असहकार्य.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, वक्फ बोर्डाच्या ४०९ एकराच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. यातील दहा एक्कर जमिन धुळे सोलापूर महामार्गला चिटकून आहे. चौपदरीकरण आत सुमारे १५ कोटींचा मावेज आला होता.

तो लाटण्यासाठी अवघ्या सव्वा कोटी रुपयात वक्फ बोर्डाची जमीन खालसा करून खाजगी लोकांच्या घशात घातल्याचे समोर आले आहे. वक्फ बोर्ड अंतर्गत हजरत शहा वली दर्गा ची निजाम काळापासून ७९६ एकर ७७ गुंठे जमीन आहे. यापैकी काही जमिनी हे दुमततास म्हणून सेवाकरणा-यांना दिलेल्या आहेत.

मात्र २०१६ मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून मूळ सातबारावरील धारकाचे नाव कमी करून त्या ठिकाणी हाबीबुद्दिन सरदारोद्दिन सिद्दिकी रा. औरंगाबाद व त्याच्या इतर नातेवाईकांच्या नावे केली.

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ साठी दर्ग्याची सर्वे क्रमांक २२ व ९५ मधील जमीन संपादित केली होती. तेथे दर्ग्याची एकूण दहा एकर जमीन आहे त्याच्या मोबदल्यात पोटी १५ कोटी रुपये आले होते.

ते हडप करण्यासाठी संपूर्ण दहा एकर जमीन अवघ्या एक कोटी ३० लाख रुपयात हाबीबुद्दिन सिद्दीकी व इतरांनी विक्री केली आहे. हा सगळा गैरव्यवहार तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आढाव पाटील तत्कालीन तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांशी संगनमत करून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here