विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणाऱ्या “पटेल” विरूद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई,

0
Spread the love

पोलीस आयुक्त यांची अबतक ५३ वी कारवाई,

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगार याच्या विरुद्ध एम.पी.डी.ए नुसार कारवाई करण्यात आली आहे. अरबाज आयुब पटेल, वय २३ वर्षे,
रा. लेन नं.४ वडगाव शेरी, पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.

त्याने त्याचे साथीदारांसह विमानतळ पोलीस ठाणे, हद्दीमध्ये कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न,घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

मागील ५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी
कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पटेल विरुध्द एम.पी.डी.ए कायदयान्वये औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.भरत जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे, वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी यांनी कामगिरी पार पाडली.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

त्यानुसार मागील १ वर्षामध्ये कालावधी मध्ये ५३ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here