पत्रकाराच्या नावानेदेखील बनावट वेबपेज.
त्वरित कारवाई करावी राष्ट्रीय महिला आयोग.
पुणे सिटी टाईम्स (PCT) मुस्लिम महिलांची बदनामी करण्यासाठी काही अज्ञात लोकांनी दिल्लीतील महिला पत्रकाराच्या नावे बनावट वेबपेज तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
काही मूळ छायाचित्रांची छेडछाड करून त्या प्रतिमा बनावट वेबपेजवर झळकविण्यात आल्या. पोलिसांनी आता हे वेबपेज समाजमाध्यमावरून काढून टाकले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे.
मुंबई पोलिसांनाही या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. गीटहब ॲप वर हे बनावट वेबपेज तयार करण्यात आले होते. महिला पत्रकार व अन्य काही महिलांनी काढलेल्या छायाचित्रात फेरफार करून खोट्या प्रतिमा बनावट पेजवर टाकण्यात आल्या.
हे गैरकृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिला पायलट व पत्रकार व अन्य महिलांची बदनामी करण्यासाठी या वेबपेज वर त्यांची फेरफार केलेली छायाचित्रे अपलोड केली जात होती.