नागरिकांचे आरोग्य धोक्यात, गटारीचा पाणी वाहतोय “धोधो “
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान
कोंढवा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून वानवडी क्षेत्रीय अधिकारी दिवाळी गोड करण्यास मग्न असून त्यांचे कोंढवाकरांवर सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही माजी नगरसेवक, संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांनी केला आहे.
फक्त येऊन पाहणी करून जाणे याला काय नियोजन म्हणतात का? असा प्रश्न देखील नागरिकांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पाऊस मोठया प्रमाणावर झाल्याने कोंढवा वासियांचे जीव व आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून गटारीचा पाणी “धोधो ” करून वाहत आहे. नवाजीश पार्क, मिठागर व इतर ठिकाणी गटारीचा पाण्याचा प्रवाह खुप मोठा आहे. ते प्रवाह थाबांयला काय तयार नाही? जुन्या काळातील ड्रेनेज लाईन असल्याने व आताच्या कोंढवा येथील लोकसंख्या पाहता ते ड्रेनेज लाईन कमी पडत आहेत. तसेच शून्य नियोजन कारभाराबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
एका माजी नगरसेवक गफूर पठाण यांनी थेट हातात बांबू घेऊन वानवडी क्षेत्रीय कार्यालय गाठून आज आदोंलनच केले. हातातील बांबू बघून अधिकाऱ्यांची बोबडीच वळाली.
तर लवकर नियोजन बद्द काम झाले नाही तर अखखे कोंढवाकर रस्त्यावर उतरणार असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार दखल घेणार का? नागरिकांचे जीव धोक्यात घालणार? हा येणारा काळच सांगेल.