क्रिस्टल कंपनी विरोधात पुणे महानगर पालिका आयुक्त व कामगार आयुक्त कारवाई करणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी १९०० कामागारांची दिवाळी गोड नाहीच? ३ महिन्यांपासून पगार नसल्याने काही मिनिटांपूर्वी कामगारांनी पुणे शिवाजीनगर येथील ठेकेदाराच्या कार्यालयात ठिय्या आदोंलन करण्यात आले आहे.
पुणे महानगर पालिकेतील कामागारांची अधिक व कर्मचारी यांची दिवाळी गोड झाली असली, तरी हातावर पोट असलेल्या कंत्राटी कामगारांची दिवाळी अजूनही गोड झालेले नाही? क्रिस्टल कंपनीने गेल्या ३ महिन्यांपासून पगार व आता दिवाळी बोनस न दिल्याने आज दि .२१ रोजी सायंकाळी कामगारांनी ठिय्या आदोंलन केले आहे.असे काही कंत्राटी कामगारांनी पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.