कोंढव्यातील शिवनेरी नगर येथे एकावर जिवघेणा हल्ला; ३०७,३२३ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

कोंढवा येथील शिवनेरी नगर येथे शुल्क कारणावरून एकावर जिवघेणा हल्ला चढवला असल्याने कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रविण पल्लेलु,वय ३२ वर्षे,रा.शिवनेरी नगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ३०७,३४१,३२३,५०४,३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवनेरी नगर गल्ली नं. ३० येथील विक्की चिकन दुकानाचे जवळ फिर्यादी हे त्यांचा मित्र अजय माटे याचेसह रिक्षा मधुन शिवनेरीनगर रोडने घरी जात असताना ३ जणांनी संगनमत करून, फिर्यादी यांची रिक्षा अडवुन,

शिवीगाळ केली, खालच्या कोंढव्यात सोड असे म्हणाले, त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना नकार दिला असता, त्यांनी त्यांचे जवळील कोयत्याने जीवे ठार मारण्याचे उददेशाने, फिर्यादी यांचे डोक्यात वार करुन,लाथा-बुक्कयांनी दगडांनी मारून,त्यांना गंभीर जखमी करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हसीना शेख करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here