वाहतूक पोलिसच शासनाच्या तिजोरीवर मारतायेत डल्ला?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
आज दिवसेंदिवस लाचेचे प्रकार वाढले असून, लाच मागण्यात वाहतूक शाखा देखील काही मागे नाही? वाहतूक विभागाने आता नवीन संकल्पना आणली असून महिला पोलिस कर्मचाऱ्यांना पुढे करून लाचेचे मागणीचे प्रकार पुणे शहरात वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच वानवडी वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी टेम्पो चालकांकडून लाच घेतानाचा व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केले होते. तर आता आणखीन एक प्रकार समोर आला आहे.
हकीकत अशी की, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत काम करणारे पती-पत्नी २ सप्टेंबर २०२३ रोजी काही कामा निमित्ताने शनिवार वाड्या जवळील देसाई कॉलेज जवळ गेले होते आणि चारचाकी वाहन (MH. 14.DA.8808) तेथे पार्क केली होती. त्या वाहनाला विश्रामबाग वाहतूक शाखेतील जावध नामक महिला वाहतूक पोलिसाने जॅमर लावले होते.काही वेळाने ते पती-पत्नी वाहना जवळ आले असता सदरील वाहनाला जॅमर लावल्याचे दिसले. बरीच वेळी वाट पाहत बसल्यानंतर महिला वाहतूक पोलिस त्या ठिकाणी आल्या, आणि जॅमर काढण्यासाठी १५०० रुपयांची मागणी केली.
आम्ही पण सरकारी कर्मचारी आहोत. १५०० कशाचे? तुमच्याकडे तसे काही नियमानुसार आदेश किंवा दंडात्मक कारवाईचे दरपत्रक आहे का? अशी विचारणा केली असता, त्या महिला वाहतूक पोलिसाने वाद घालत १५०० रूपये भरावेच लागतील. असा पवित्रा घेतल्याने, भीक नको कुत्र आवर म्हणत त्या पती-पत्नीने अखेर महिला वाहतूक पोलिसाने सांगितलेल्या फोन नंबरवर ऑनलाईन गुगल-पे द्वारे १ हजार ७२ रुपये ट्रान्सफर केले.
परंतु घरी गेल्यावर त्या पती-पत्नीला संशय आल्याने त्यांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. पुणे सिटी टाईम्सने माहिती घेतली असता, जय संजय दोडके याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बॅंकेत पैसे ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले आहे. सदरील दंडाची रक्कम शासकीय दरबारात जमा न होता स्वताच्या आर्थिक फायदयासाठी महिला वाहतूक पोलिस जाधव यांनी वापरल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे.
तर असे दिवसभरात किती रक्कम स्वताच्या आर्थिक फायदासाठी खिशात घातली जात असेल? शासनाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या महिला पोलिसावर निलंबनाची कारवाई मागणी होत आहे.वाहतूक विभागात लाचेचे प्रकार वाढले असून कारवाईची मागणी पुणेकरांकडून होत आहे. तर त्या महिला वाहतूक पोलिसावर निलंबनाची मागणी केली जात असून त्यावर पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार व पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर काय कारवाई करतील या संदर्भात पुणे सिटी टाईम्स लक्ष वेधून राहणार आहे.