विमानतळ पोलिस ठाणेच्या हद्दीतील हॉटेल ( पब) चालकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याने पोलिसांचे कारवाईचे पत्र थेट राज्य उत्पादन शुल्क विभागालाच.हॉटेल चालकांमध्ये उडाली खळबळ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

विमानतळ पोलिस ठाणेच्या हद्दीतील हॉटेल ( पब) चालकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याने पोलिसांचे कारवाईचे पत्र थेट राज्य उत्पादन शुल्क विभागालाच देण्यात आले आहे.हॉटेल चालत हे मनमानी करत आहेत. वेळेच्या आणि अटीशर्तीच्या निर्बंधाचे या हॉटेल चालकांनी वेळोवेळी उल्लंघन केले आहे.त्याच्यावर वेळोवेळी कारवाई देखील करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या वर्तनात कोणताही फरक पडत नाही. हे हॉटेलचालक जाणून बुजून प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे या हॉटेलवर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचा एफएल -३ परवाना रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.विमानतळ पोलीस ठाणेच्या हद्दीतील हॉटेल ट्रॉप्सीहॉर्स, हॉटेल बॅक स्टेज, हॉटेल रूढ लॉन्स, हॉटेल एस्काड या हॉटेलची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली आहे.पुणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे शहराचे अधीक्षक यांना हे पत्र पाठवले आहे.

वरील हॉटेल नेमून दिलेल्या वेळेत बंद करण्यात यावे यासाठी वारंवार नोटिसा दिल्या आहेत. प्रत्यक्षात जाऊन ही कारवाई केली आहे. मात्र तरीही रात्री उशिरापर्यंत ही हॉटेल्स सुरू असतात. तसेच या आस्थापनामध्ये दारू पिऊन धिंगाणा करून हाणामारी आणि विनयभंगासारखे प्रकार घडू लागले आहेत. अशा प्रकारची गुन्हे दाखल होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असे पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here