पुणे सिटी टाईम्स च्या बातमीचा परिणाम..
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुण्यातील काळेपडळ वाहतूक विभागातील पोलिस कर्मचाऱ्याची मुजोरीचा व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सने प्रसारित केला होता. त्या व्हिडिओची चर्चा काल दिवसभर चांगलीच रंगली. अखेर त्या व्हिडिओची दखल घेऊन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याची उचलबांगडी करत त्यांना कंट्रोल रूमला जमा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
काळेपडळ वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी गणेश कामथे हे वाहनांचे फोटो स्वताच्या मोबाईल फोन मध्ये काढत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आणि नागरिकासोबत अरेरावी करत एकदम उर्मट भाषा वापरत असल्याचा दुसरा व्हिडिओ प्रसारित केला होता.
गणेश कामथे यांच्या बाबतीत स्थानिक नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या परंतु त्यांच्या एकदम आक्रमक बोलण्यामुळे नागरिक गप्प बसत होते. शेवटी कडक शिस्त लावणाऱ्या पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी गणेश कामथे यांची बदली केली आहे.