कोंढवा सर्वे नं ५५ भाग्योदय नगर मध्ये बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल करून डोंगर पोखरून बेकायदेशीर बांधकामाला सुरूवात, कारवाईची मागणी.

0
Spread the love

रॉयल्टी बुडवून शासनाला लावला घोडा?

पुणे महानगरपालिकेने तात्काळ वर्क स्टॉप नोटीस द्यावी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

कोंढव्यातील सर्वे नं ५५ भाग्योदय नगर वैशाली दवाखान्याशेजारी १० गुंठ्यात बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर बांधकाम करण्यासाठी बेकायदेशीरपणे डोंगर पोखरले आहे. हकीकत अशी की, कोंढवा खुर्द भाग्योदय नगर मध्ये १० गुंठ्याचे प्लॉट काहींनी खरेदी केले. त्या प्लॉटवर अंदाजे १० ते १५ झाडे होते. सदरील जागा ही पाच पाच गुंठयाची वाटणी होऊन सदरील जागेत असलेले झाड पुणे महानगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे सदरील झाडांची कत्तल करण्यात आली.

त्या संदर्भात पुणे महानगर पालिकेकडे तक्रार दाखल झाल्याने वृक्ष अधिकाऱ्यांनी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी नोटीस बजावून खुलासा मागितला होता. परंतु तब्बल ७ महिन्यांचा कालावधी झाला तरी अद्यापही झाडांची कत्तल करणाऱ्यांनी खुलासा केला नसल्याचे वृक्ष अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे डोंगर पोखरण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असताना सदरील धनाजी बिल्डरांनी कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी न घेता बेकायदेशीररित्या डोंगर पोखरून काम चालू केले आहे.

त्यात विषेश म्हणजे शासनाला कोणतीही रॉयल्टी न भरता शासनाची लाखो रूपयांची लूट करण्यात आली आहे. सदरील प्रकारची मामलेदार कचेरी ( हवेली) येथे माहिती घेतली असता डोंगर पोखरण्याची व गौण खनिज उत्खननाची परवानगी दिली नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

याचाच अर्थ मनमानी पध्दतीने काम करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. तर यासंदर्भात लवकरच पुणे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन कारवाईची मागणी केली जाणार आहे. क्रमशः ( पुढील बातमी : सबका साथ आणि भाजपाच्या कार्यकर्त्याचा विकास) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here