पुण्यातील वानवडी येथील पनीर कारखान्यावर अन्न औषध विभागाचा छापा, तब्बल ३ लाखांचा ८०० किलो बनावट पनीर जप्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुण्यातील वानवडी येथील एका कारखान्यावर अन्न औषध विभागाने छापा टाकून तब्बल ३ लाखांपेक्षा जास्त रूपयांचा ८०० किलो पनीर जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. अन्न औषध विभागाने कारखान्यावर छापा टाकला असता ८०० किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले.

हे पनीर तयार करण्यासाठी ३५० किलो स्किम्ड मिल्क पावडर व २७० किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत १ लाख ६७ हजार ७९० रूपये किमतीचे ७९९ किलो पनीर, १ लाख २१ हजार ८०० रूपये किमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३९ हजार ६६४ रूपये किमतीचे २६८ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ३ लाख २९ हजार २५४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सहायक आयुक्त बाळू ठाकूर अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८०० २२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी,आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here