अलंकार पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल.( Alankar police station)
पुणे सिटी टाईम्स ; प्रतिनिधी. नवीन फडंयांचा अवलंब करून आज फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक नविन फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे.
मी पुणे कार्पोरेशन मधून आलो आहे. तुमचे ड्रेनेज चोक-अप झाले असुन,त्याचे काम करावे लागेल नाहीतर पीएमसीकडुन ( PMC) दंड आकारला जाईल अशी भिती घालुन, सदरचे ड्रेनेज साफ करुन देतो असे सांगुन फसवणूक केली आहे.
या प्रकरणी एका २० वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून,फिर्यादी व त्यांचे आजोबांकडुन वेळोवेळी एकुण ८२ हजार रुपये तसेच साक्षीदार यांचीदेखील १७ हजार ५०० रुपये
वेळोवेळी घेवुन दोघांची मिळुन एकुण ९९ हजार ५००रुपयेची फसवणुक केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे करीत आहेत.