खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंज पेठ भागात दहा लाखांचा गुटखा गुन्हे शाखेकडून जप्त; मुलाणी व नाईकवाडी विरोधात गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंज पेठेतून १० लाखांचा अवैध गुटखा गुन्हे शाखा खंडणी विरोधी युनिक १ ने कारवाई करून जप्त केला आहे. एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेला १० लाख ५६ हजार ६४० रुपयांचा पान मसाला, गुटखा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने जप्त केला आहे.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात हवालदार संजय भापकर यांनी फिर्याद गुन्हा रजिस्टर नं २६३ / २२ दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ख्वाजा ऊर्फ साहिल अस्लम मुलाणी वय २० आणि शादाब मुश्ताक नाईकवाडी वय २४, रा. गंज पेठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुटख्याला बंदी असतानाही त्याची चोरुन विक्री केली जात आहे. गंज पेठेतील नूर कॉटर्सच्या मागे असलेल्या खोलीमध्ये गुटख्याचा साठा केल्याची
माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी
मंगळवारी सकाळी छापा टाकून १० लाख ५६ हजार ६४० रुपयांचा
माल जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here