महर्षीनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने थेट केला आत्महत्याचा प्रयत्न ; तरूणीवर गुन्हा दाखल तर तरुणाला अटक

0
Spread the love

ओळखीच्या व्यक्तीने केला विनयभंग

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

महर्षीनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने थेट केला आत्महत्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.ओळखीच्या तरुणाने भर रस्त्यात मिठी मारुन विनयभंग केल्या प्रकरणी महर्षीनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने ओढणीने आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी १९ वर्षाच्या तरुणीवर आत्महत्येस प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.तसेच या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर १८५/२२ करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहसीन तन्वीर खान वय २१, रा. गुलटेकडी याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व मोहसीन खान हे दोघे ओळखीचे आहेत.खान याने या तरुणीला २८ ऑगस्ट रोजी फोन करुन गुलटेकडी येथील व्हेईकल डेपोच्या ग्राऊंडमध्ये बोलविले. ही तरुणी रात्री ११ वाजता तेथे गेली असताना खान याने फिर्यादीस मिठी मारुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

त्यावर फिर्यादीने काय करतोय, असे विचारले असता त्याने तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणाला.कोणास काही सांगितले तर बदनामी करुन तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here