गोटिराम भैय्या चौक मंडई येथे पोलीस उप निरीक्षक पवार व पोलीस अमलदार स्वप्नील कदम यांनी संजय भिकू खांबे यांचे हरवलेले पाकीट व ८ हजार रूपये परत केले.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे :- खडक वाहतूक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी वाहतूक नियमनाचे कर्तव्य करत असताना दुपारच्या सुमारास गोटिराम भैय्या चौक मंडई चौका मध्ये ऐक काळ्या रंगाचे पाकीट रस्त्यावर पडलेले पोलीस उपनिरीक्षक पवार व पोलीस अमलदार स्वप्नील कदम यांना दिसले.
पाकीट उघडून पाहिले असता त्या पाकीटा मध्ये ८ हजार रुपये होते. त्या वेळी चौका मध्ये असलेल्या लोकांना सदर पाकीट कोणाचे आहे. असे विचारले असता पाकीटा बाबत कोणीच काही माहिती सांगितली नाही.
त्यानंतर पाकीट मध्ये एक फोटो मिळाला त्या फोटोच्या आधारे पाकीट मालकाचा शोध घेतला तेव्हा त्या पाकीट बाबत खात्री करून संबंधित व्यक्तीला त्याचे पाकीट व त्यातील आठ हजार रु रोख रक्कम परत केली. पाकीट व रक्कम परत मिळाल्या मुळे कामगार खांबे यांनी खडक वाहतूक पोलिसांचे आभार मानले.