“मॅडम इज बॅक” म्हणत हवेलीत आनंदाचे वातावरण.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना निलंबित करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर कोलते यांनी हार न मानता जिद्दीने सामोरे जाऊन अखेर स्वतःवरील कारवाई ही चुकीची असल्याचे दाखवून दिले आहे.
हकीकत अशी की,हवेली तालुक्यातील तत्कालीन तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांच्यावर ९ डिसेंबर २०२२ रोजी झालेली निलंबनाची कारवाई रद्द करुन दोन आठवड्यांत निलंबनापूर्वी ज्या ठिकाणी रुजू होत्या, त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्थात मॅट ने दिले आहे.मॅटचे न्यायाधीश ए. पी. कुर्हेकर यांनी यासंदर्भात आदेश दिले आहे.यामुळे तृप्ती कोलते-पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकराने तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांच्या कार्यकाळामध्ये सर्व्हे नं.६२ हडपसर येथील वनजमीन शासनाच्या परवानगीशिवाय खासगी खातेदाराच्या नावे केली. तसेच कोविड काळात खर्च केलेला निधी हा कार्यालयीन पद्धतीने केला नाही. खर्च करताना अनियमितता केली. निर्वासित जमीन वाटप करताना कार्यक्षेत्राचे उल्लंघन करुन निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
निवडणुक प्रक्रियेमध्ये तृप्ती कोलते यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.या निर्णयाविरोधात कोलते यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये मॅटमध्ये धाव घेतली. कोलते यांच्या वतीने अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी बाजू मांडली आहे.