पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे शहरात राजरोसपणे नागरिकांचा जिव धोक्यात घालून अवैधरित्या चालणाऱ्या रिक्षा वाहतुकीला पुणे शहर वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असल्याचे पुणे सिटी टाईम्स “वॉच” मध्ये दिसून आले आहे. दुचाकी वाहनांवर कारवाई करून धन्यता मानणारे वाहतूक पोलिस क्षमतेपेक्षा जास्त अवैधरित्या सिट वाहतूक करणा-या रिक्षांवर मेहरेनजर करत असल्याचे दिसून आले आहे.
सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलिसांना चिरीमिरी मिळत असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींनी पाहणी केली असता हडपसर ते स्वारगेट व हडपसर ते सय्यदनगर क्षमतेपेक्षा सिट वाहतूक होताना दिसून आली तर याकडे हडपसर (वैदवाडी) वाहतूक विभागाचे दुर्लक्ष दिसून आले,
हडपसर मार्गाने स्वारगेट व पुणे रेल्वे स्थानका पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर वानवडी वाहतूक विभाग लागले, परंतु वानवडी वाहतूक पोलिस फक्त दुचाकीवर कारवाई करत होते त्यांनी रिक्षाकडे कानाडोळा केला. स्वारगेट ते कात्रज येथे सिट वाहतूक होत असताना पाहणी दरम्यान वाहतूक पोलिस दुचाकीस्वारांवर ऐमाने ऐतेबाराने कारवाई करताना दिसले परंतु त्यांच्या समोर क्षमतेपेक्षा जास्त सिट भरून नेताना त्यांनी रिक्षांवर कारवाई केली नाही. तर ती रिक्षा स्वारगेट ते सहकारनगर मार्ग होत कात्रज येथे पोहचली परंतु तेथे भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाईत मग्न होते, परंतु त्यांनी पण भरगच्च भरलेली रिक्षा थांबवली नाही.
खडक वाहतूक पोलिसांच्या हद्दीतील गोटीराम भैय्या चौक, प्यासा हॉटेल पासून ते स्वारगेट पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या सिट वाहतूक होत असल्याचे दिसून आले, विषेश म्हणजे खडक वाहतूक विभागा समोरूनच रिक्षा सिट वाहतूक सुरू असतानाही कारवाई दिसली नाही. मार्केट यार्ड ते पुणे रेल्वे स्थानक, हडपसर ते रेल्वे स्थानक, स्वारगेट ते रेल्वे स्थानक,कोंढवा ते रेल्वे स्थानक,कात्रज ते रेल्वे स्थानकाला जाताना मध्ये समर्थ वाहतूक विभाग लागले परंतु वाहतूक पोलीसांनी रिक्षा न थांबता त्याकडे दुर्लक्ष केले.
जेव्हा पुणे रेल्वे स्थानक येथे पोहचल्यावर वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांवर कारवाई करताना दिसले, परंतु त्यांच्या डोळ्यासमोरच अवैधरित्या सिट वाहतूक व रिक्षा मध्ये सिटा भरत असताना बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोलिस इमानदारीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसून आले आहे. परंतु रिक्षा चालकांकडे व काही वाहतूक पोलिसांशी चर्चा केल्यानंतर भलतीच माहिती समोर आली आहे.
वसुली बहादूरांच्या आशिर्वादाने अवैधरित्या रिक्षा वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तर ते वसुली बहादूर कोण या बद्दल माहिती घेतली असता हडपसरला ( अमोल लोंढे,करचे), हांडेवाडी ( शेख मामू), कोंढवा ( रजपूत, धनगर),स्वारगेटला (होळकर), समर्थ ( शरद पाटील), बंडगार्डन ( माने), अशी नावे समोर आली आहे? तर काही रिक्षा चालकांनी देखील याला दुजोरा दिला आहे.
तुमच्यावर कारवाई वाहतूक पोलीस यासाठीच करत नाही का? असा प्रश्न विचारल्यावर रिक्षा चालक म्हणाले तुम्ही आता प्रवास करून आलात, पाहिलात ना वाहतूक पोलीसांनी कुठं अडविले? म्हणजेच वसुली बहाद्दरांच्या आशिर्वादाने नागरिकांचे जीव धोक्यात घालून मलाई लाटली जात आहे? एखाद्या वेळी रिक्षाचे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? वाहतूक पोलीस याची जबाबदारी घेणार का? मलाई खाऊन पोटसुळे होणार व नागरिकांचा जीव धोक्यात जाताना पाहत बसणार? या मिळणाऱ्या मलाई मध्ये पार वर पर्यंत साखळी आहे का?असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून पोलिस आयुक्तांनी व वाहतूक पोलीस उपायुक्तांनी ठोस पावले उचलण्याची अत्यंत गरजेचे आहे. क्रमशः