गुरूवार पेठेत अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन; तीनपट कारवाईची मागणी

0
Spread the love

इमारत बांधकामासाठी शासनाचे नुकसान करून केले अवैध गौण खनिज उत्खनन?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील माजी नगरसेविकेच्या घरासमोर महसूल विभागाची कोणतीही लेखी परवानगी न घेता अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिटी सर्वे नंबर ६४१ गुरूवार पेठ, मंगल क्लब येथे इमारतीचे बांधकाम सुरू झाले असून त्याठिकाणी सध्या २०० ब्रास पेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

या बद्दल पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींनी मामलेदार कचेरी येथील पुणे शहर तहसील कार्यालयात माहिती घेतली असता सदरील बांधकाम व्यवसायिकाने कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता व लेखी परवानगी न घेता गौण खनिज उत्खनन केल्याची माहिती मिळाली आहे. तर सदरील गौण खनिज उत्खनन अवैधरित्या वाहतूक करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. तलाठी मात्र ढिम्मच बसले असून कारवाई व पंचनामे केले नसल्याची माहिती मिळाली आहे.

एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेविकेच्या घरासमोर असे प्रकार सुरू असून शासनाचे महसूल बुडवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.

तर आता थेट प्रांत अधिकारी यांच्याकडे सदरील प्रकरण पुणे सिटी टाईम्स नेणार आहेत. गोरगरिबांकडून शुल्क रक्कम देखील वसूल करणारे महसूल विभाग तीनपट दंडाची वसूली करणार का? याकडे लक्ष टिकून राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here