पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने एनआयबीएम रोडवरील पत्र्याच्या शेडवर मोठी कारवाई केली. त्या कारवाईत कोणालाही सोडले नाही, तर सरसकट कारवाईच केली. अशीच कारवाई कौसरबाग मधील बेकायदेशीर पत्र्याच्या शेडवर का होत नाही, असा गंभीर प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.

कौसरबाग मधील मनिष अपार्टमेंट, कॅपिटल मॉलसमोर अफगाण जायका रेस्टॉरंट, सुपर ऑटो, पाकिजा रेस्टॉरंट, हाजी नुरा निहारीवाला, चायनीज किंग, कलीम फिश मार्केट, त्या शेजारी गॅरेज तसेच पुढे बॉम्बे सिख परठा व समोसा कॉर्नर या ठिकाणी यापूर्वीही कारवाई होऊनही पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे ठाण मांडून बसलेले दिसून येत आहे.

पालिकेच्या दुर्लक्षामुळेच कौसरबाग परिसरात बेकायदेशीर बांधकामांना उत आले आहे. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कारवाई करून साहित्य जप्त केले असते, तर आज ही वेळ आली नसती. आता पालिका बांधकाम विभागाची कारवाई किती तत्परतेने होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. क्रमशः





