पुणे महानगर पालिकेने केलेल्या कारवाईच्या जागेवर पुन्हा पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सुरू.
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
पुण्यातील कोंढवामध्ये बेकायदेशीर बांधकामांना लगाम घालण्यासाठी सिंगम अधिकारी पालिकेला भेटाना.. बेकायदेशीर बांधकामे उंड होत चालली आहे. तर बेकायदेशीर बांधकाम करणारे आता नाले ओढे देखील पचवत आहे कारण यांना लगाम घालण्यासाठी कोणीच पुढे येईना?
कौसरबाग ग्रँड दरबार हॉटेल समोरील नाल्यावर बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड उभारण्याचे काम बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी नाल्यावरील पत्र्याचे शेडची तक्रार दाखल झाल्यानंतर पालिकेने सदरील ठिकाणी कारवाई करून पत्र्याचे शेड पाडण्यात आले होते.
परंतु आता त्या ठिकाणी कोणाच्यातरी मदतीने पुन्हा बेकायदेशीर शेड उभारण्याचे काम जोमाने सुरू आहे. सदरील शेड तातडीने पाडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर सोमवारी या बेकायदेशीर बांधकाम संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्न विचारला जाणार आहे.