आझम कॅम्पसमध्ये बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणे भोवले.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील नावाजलेले आझम कॅम्पसमध्ये बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी. ए.इनामदार यांच्या आझम कॅम्पसमध्ये असा प्रकार घडल्याने अनेकांचे भव्या उचांवलया आहेत.
हकीकत अशी की पी.ए.इनामदार यांच्या आझम कॅम्पस गेट नंबर ४ मधील आतील बाजूस भलेमोठे गौण खनिज उत्खनन केल्याचे दिसून आले होते. त्याची तक्रार झाल्याने पुणे शहर तहसीलदारांनी नोटीस बजावून खुलासा मागितला होता. परंतु खुलासा न मिळाल्याने तक्राराने ईटीएस मोजणी करायला लावली होती.
ईटीएस मोजणी झाल्यानंतर ३६५३.६५६ अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचे मोजणीनुसार समोर आले. त्या अनुषंगाने तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी पी. ए. इनामदार यांना नोटीस काढून २ कोटी ६५ लाख ७ हजार २७५ इतकी रक्कम शासन दरबारी भरण्याची नोटीस काढली. त्या प्रकरणात पी. ए. इनामदार यांच्या वकिलांनी तहसीलदार यांच्या समोर त्यांची बाजू मांडली.
परंतु तहसीलदार येवले यांनी ती फेटाळून लावली आणि २ कोटी ६५ लाख ७ हजार २७५ रूपये भरावेच लागतील असे स्पष्ट आदेश काढले आहेत. सदरील प्रकरणात समाजिक कार्यकर्ते अजहर अहमद खान यांनी पाठपुरावा केल्यानेच पुढील आदेश पारित झाले आहे.
” पी. ए. इनामदार यांना २ नोटीस परंतु शुन्य भरपाई? “
तहसीलदार कार्यालयातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इनामदार यांच्या नावाने दंड तात्काळ भरण्यासाठी दोनदा नोटीस काढण्यात आली आहे. परंतु इनामदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद किंवा दंड भरण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे. याचाच अर्थ तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यावर आता तहसीलदार सुर्यकांत येवले काय भुमिका घेणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.