राजकीय पक्षाच्या पाठबळामुळे बेकायदेशीर बांधकाम.
पुणे महानगर पालिकेचा नवीन जावाई शोध, बेकायदेशीर बांधकाम पाडायचे सोडून फक्त स्लॅबला खड्डे मारण्याचा प्रकार.
कोंढवा बुद्रूक स. नं ५ मध्ये जॉक कटर कारवाई होऊ शकते मग बाकीच्या ठिकाणी का नाही?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे कोंढवा बुद्रूक स नं ५ मध्ये एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून जॉक कटर लावून मोठ्या थाटामाटात गरीबांची घरे जमिनदोस्त करण्यात आली त्या बिचाऱ्या गरीबांचा कैवारी कोणीच नव्हतं. तर कोंढवा खुर्द मध्ये मधील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना राजकीय कार्यकर्त्यांचा पाठबळ असल्याने या बांधकामांना संरक्षण दिले जात आहे.
सर्वे नं ५६ शिवनेरी नगर गल्ली नंबर १२,हनुमान मंदिराच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे भलेमोठी इमारत उभी करण्यात आली आहे. तर शिवनेरी नगर गल्ली नंबर १३ मध्ये प्राईड मेडिकल शेजारी देखील बिनदिक्कतपणे कायद्याची कोणतीही भिती न बाळगता शोएब बियाबाणी व फरमान शेख व चेतन लोणकर या धनाजी बिल्डरांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे.
मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत असताना पालिका कर्मचारी फक्त नोटीसा देऊन काम चलाओ सरकार म्हणणे प्रमाणे स्लॅबला खड्डे मारून मोकळे? खड्डेची कारवाई नंतर सेटलमेंट आणि मग पुन्हा खड्डे बुजवून फटाफट फ्लॅट विक्री करून नागरिकांचा जीव धोक्यात घातले जात आहे.
यापूर्वी कोंढव्यामधील बरीचशी बेकायदेशीर बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. परंतु पालिकेने आता नवीन जावाई शोध आणला आहे. फक्त खड्डे मारायचे आणि मी मारल्या सारखे करतो तु रडल्यासारखे कर,असा उद्योग पालिका करत आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आतातरी जॉक कटर ने बेकायदेशीर बांधकामे जमिनदोस्त करावी अन्यथा कोंढवामध्ये एखादी इमारत पडली तर याला पालिकेचे अधिकारी कर्मचारीच जबाबदार राहणार आहे. पालिका आता यावर जॉक कटर ने कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष टिकून राहणार आहे.
” गेल्या गुरूवारची कारवाई स्थगित “
गेल्या गुरूवारी शोएब बियाबाणी व फरमान व चेतन लोणकर यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई होणार होती. परंतु सदरील कारवाई टाळण्यात आली या मागचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.