२८ तोळे सोने चोरीची तक्रार असताना गुन्हा दाखल न करता फक्त आणि फक्त ५ हजारांचे दंड आणि मग फाईल झाली थंड?
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार अश्या महाभागांवर चोरीचे गुन्हे दाखल करणार का❓
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
साधी कोणी शिवीगाळ केली तरी पोलिस कोणाला सोडत नाही एनसीआर दाखल करतात अथवा गुन्हा गंभीर असेल तर गुन्हा दाखल करतात.परंतु दंड करत नाही कारण कायदा हा सर्वांसाठी समान आहे. परंतु पुण्यातील त्या ४ पोलिसांसाठी कायदा समान नाही. कारण त्यांच्यावर २८ तोळे सोने चोरीची तक्रार असताना गुन्हा दाखल न करता फक्त आणि फक्त ५ हजारांचे दंड आणि मग फाईल झाली थंड? हे कसे काय होऊ शकते. मग पोलिसांनी नागरिकांना पण दंड भरून गुन्हयातुन बाहेर पडण्याची मुभा देण्यात यावी.
वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेअसलेल् ४ पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्नाटकातील सराफावर दबाव टाकून २८ तोळे सोने लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्तांनी ४ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
सोने लाटल्याची तक्रार केलेल्या सराफाने प्रतिज्ञापत्र देऊन तक्रार मागे घेतली आहे. यामुळे सराफावर कोणी दबाव टाकला का? असा प्रश्न उपस्थित रहात आहे.
हा संपूर्ण प्रकार बल्लारी (कर्नाटक) येथील व्यापारी कपिल मफतलाल जैन यांच्याशी संबंधित आहे. कपिल जैन यांनी तक्रार केली होती की, वानवडी पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी जुन्या चोरीच्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात आले आणि दबाव टाकून सोने घेऊन गेले.
कपिल मफतलाल जैन (रा. बल्लारी, कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे.कोयता गँगमधील आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार जैनने १० ग्रॅमच्या नेकलेसच्या बदल्यात ३० हजार रूपये दिल्याचे पोलिसांना सांगितले.
त्यानंतरही वानवडी पोलिसांनी तू चोराकडून १०० तोळे सोने घेतले असून ते चोरीचे असल्याचा दबाव टाकला. गुन्ह्याच्या तपासासाठी दागिने ताब्यात दे असे सांगत चौघांनी तडजोडीअंती २८० ग्रॅम सोने स्वतःकडे घेतले.
पोलीस सोने घेऊन गेल्यानंतर जैन यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात चौकशी केल्यानंतर स्पीड पोस्टद्वारे पुणे पोलिसांकडे संबंधिताविरूद्ध तक्रार दाखल केली. चारही पोलीसांनी केलेल्या कृत्यामुळे पोलिस खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलिस दलाची आब्रु वेशीवर टांगली गेली आहे.
तर त्या चारही महाभागांना कर्तव्यात कसूरीसह विविध कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली. त्यावर अंशतः समाधान झाल्याने भविष्यात सुधारण्याची संधी देत नोटीसमध्ये दिलेल्या शिक्षेमध्ये बदल करत परिमंडळ ५,पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या चारही जणांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात संशयाला वाव असल्यामुळे आणि चर्चेमुळे पोलीस खात्याची बदनामी झाल्यामुळे संबंधित अमलदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार आणखी यामध्ये चौकशी होउ शकते.”
डॉ.राजकुमार शिंदे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५