कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकामांना विज मिटर अजिबात देण्यात येऊ नये,तक्रार दाखल.

0
Spread the love

बेकायदेशीर बांधकामांना विज मिटर कसे पुरवले जातात? यात तडजोड होत असल्याचा संशय?

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

कोंढवा मध्ये बेकायदेशीरपणे बांधकामांचा पुर आला असताना बारा घोडे सब बराबर अशी अवस्था आता कोंढव्याची झाली आहे. बेकायदेशीर बांधकामांना पुणे महानगर पालिका अभय तर देतच आहे. त्यात आणखीन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ची भर झाली आहे.

कोंढव्यातील अनेक बेकायदेशीर बांधकामांना विज मिटर पुरवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चाळ, झोपडपट्टी, बैठकी घरे, यांना विज मिटर पुरवने आवश्यक आहे. परंतु बेकायदेशीर इमारतींना विज मिटर पुरविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

विज मिटर घेतना खोटी कागदपत्रे तयार करून एम.ई.सी.बी ची थेट फसवणूकच होत आहे. एम.ई.सी.बी एवढी मस्तवाल झाली की, कागदपत्रे खरी की खोटी याची पडताळणी करण्याची गरज भासत नाही. यावरून एम.ई.सी.बी. च्या कामकाजावर प्रश्नः चिन्ह उपस्थित होत आहे.

तर कोंढवा खुर्द,मिठानगर, भाग्योदय नगर, शिवनेरी नगर, आंबेडकर नगर, काकडे वस्ती पठाण चौक येथे बेकायदेशीर बांधकाम सध्या सुरू असल्याने त्यात प्रामुख्याने १) आंबेडकर नगर, माने हॉस्पिटल समोर (उजेर बिल्डर) कोंढवा बुद्रुक ,२) सर्वे नं ४२ मदिना टॉवर , हसनैन मस्जिद जवळ कोंढवा खुर्द,कातील बिल्डर व हाजरा डेव्हलपर माने, इक्बाल बिल्डर,‌३) भाग्योदय नगर गल्ली नं ४ विनर पॅलेस शेजारी,कोंढवा खुर्द.

४) सर्वे नं ४ काकडे वस्ती पठाण चौक, महावीर स्वामी चौक, कोंढवा खुर्द येथे माने बिल्डरचा काम चालू आहे. ५) मिठानगर राजीव गांधी इंग्लिश प्रायमरी स्कूल शेजारी, कोंढवा खुर्द.

६) मिठानगर अलफलाह मस्जिद जवळ हाजरा बिल्डर, कोंढवा खुर्द.७ ) भाग्योदय नगर गल्ली नं १८, फाइव स्टार बेकरी शेजारी इक्बाल बिल्डर,‌कोंढवा खुर्द.८) शिवनेरी गल्ली नं २, शाहरुख शेख, अल्ताफ पठाण बिल्डर. कोंढवा खुर्द.

असे बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याने सदरील बांधकामांना अजिबात विज मिटर पुरविण्यात येऊ नये अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता यावर एम.ई.सी.बी काय भुमिका घेते हे लवकरच उघड होईल. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here