झाडांची कत्तल करणाऱ्या सोबत विजय नेवसे यांचे साटेलोटे?
एक महिना उलटला तरी झाडांची कत्तल करणारे मोकळे फिरत आहेत.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन ही बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करणारे पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सापडे ना? खरंच सापडे ना का? सेटलमेंट झाली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हकीकत अशी की, कोंढवा खुर्द मिठानगर लेन नं ९ चेतना गार्डनच्या आतील बाजूस मंदिराजवळ बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी पुणे महानगर पालिका उद्यान विभाग कोंढवा हद्द असलेले विजय नेवसे यांच्याकडे ३० डिसेंबर २०२४ रोजी केली होती.
त्या तक्रारीची तात्काळ दखल घेणे विजय नेवसे यांच्यावर बंधनकारक होते. परंतु नेवसे यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता फक्त बघ्याची भुमिका घेतली. त्यानंतर पुणे सिटी टाईम्सने बातमी प्रसिद्ध करताच नेवसे यांनी सदरील जाग्यावर येऊन पाहणी तर केली ती पण नावालाच राहिली.
पाहणी करून तात्काळ पंचनामा करून नोटीस काढून गुन्हे दाखल करायचे सोडून, विजय नेवसे यांनी फक्त नोटीस काढतो, तुम्ही नाव द्या, जातो, नक्की पंचनामा करतो, सातबारा काढतो आणि मग नोटीस काढतो, असे अनेक उडवाउडवीची उत्तरे देऊन १ महिनाभर घालवला. विषेश म्हणजे ज्या वेळी झाडांची कत्तल केली जात होती. त्यावेळी समक्ष जाऊन जेसीबी जप्त केला असता तर आज गुन्हे दाखल झाला असता.
परंतु शासकीय काम करताना विजय नेवसे सारखे शासकीय कामात हलगर्जीपणा करणारे महाभाग कर्मचारी असतील तर पालिकेने अश्या कामचुकारपणा करणाऱ्यांना घरी बसवने अत्यंत गरजेचे आहे. विजय नेवसे सारखे कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे बांधकामे करणाऱ्यांसोबत साटेलोटे असल्यानेच असे प्रकार घडत आहेत? इमानदारीने काम केले असते तर आज बेकायदेशीर झाडांची कत्तल करणारे पोलिस ठाण्यात चकरा मारताना दिसून आले असते. ( क्रमशः पुढील बातमीत विजय नेवसे यांच्या कामाचा आढावा)