अवैध गौण खनिज उत्खननाची ( रॉयल्टी) दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा मिठानगर राजीव गांधी शाळेच्या शेजारी अनधिकृत बांधकाम करून पुणे महानगर पालिकेची आर्थिक फसवणूक होत असल्याचे व नागरिकांचे जीव धोक्यात घालत असल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली.
त्यानंतर काल तहसील हवेली कार्यालयात माहिती घेतली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांचा लाखो रूपयांचा महसूल बुडवून अवैध इमारत उभी करण्यात आली आहे. नियमानुसार इमारत उभी करण्यापूर्वी गौण खनिज केले जाते.
परंतु त्या पूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांच्या नावाने रॉयल्टी भरावी लागते. रॉयल्टी चोरायची व त्यात देखील काम अनधिकृत करायचे. असा प्रकार सध्या मिठानगर राजीव गांधी शाळे शेजारी चालू असलेल्या कामातून दिसून येते आहे.
तर विषेश म्हणजे पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा कारवाई करून स्लॅबला होल मारले होते. परंतु त्या होल ने काहीच फरक पडला नसून पुन्हा तिसऱ्यांदा काम चालू केले आहे. तहसीलदार कार्यालय ( हवेली) मध्ये माहिती घेतली असता अधिकृत सुत्रांनी माहिती दिली की,
सदरील ठिकाणी कोणत्याही प्रकारची गौण खनिज उत्खननासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. प्रथमदर्शनी पाहणीत अंदाजे ३/४ लाखांची रॉयल्टी बुडविल्याचे दिसून येत आहे. आता दिवाळीच्या सुट्टया असल्याने, ४ नोव्हेंबर नंतर पुन्हा पाहणी करून दंडासहीत रॉयल्टी वसुल करण्यात येईल.