पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरात कायदा सुव्यवस्थाचे धिंडवडे निघाले आहेत. रोज कुठे ना कुठे पुणे शहरात खून, मारामारी, कोयता दहशत असे पाहायला मिळते. दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे. पोलिस आयुक्तांनी कंबर कसली असली तरी, गुन्हे काही कमी होताना दिसत नाही.पुण्यात गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे.
काल रात्री दहाच्या सुमारास पार्किंगच्या जुन्या वादातून एका डिजीटल मिडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकाराचा खून करण्यात आला आहे. शाहनवाज मुलाणी असे खून झालेल्या पत्रकाराचे नाव आहे.
दिलशाद शहानवाज मुलाणी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने,गु. रजि. नं.व कलम ७१८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९,३५२,३३५(१) शस्त्र अधिनियम ३ (२५),३ (२७) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत शामराव पाटील, ४५ वर्षे, राहणार – श्रीराम मित्र मंडळ अशोक नगर येरवडा या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १० वाजता यातील फिर्यादी श्रीराम मित्र मंडळ अशोकनगर येरवडा पुणे या ठिकाणी फिर्यादी यांचे शेजारी राहणारे श्रीकांत शामराव पाटील यांनी जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगच्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी यांचे पती शहानवाज मुलानी यांच्यावर आरोपीतेने त्यांचे कडील १२ बोअर च्या बंदुकीतून डोक्यावर गोळी मारून गंभीर जखमी केले.
गोळी डोक्यात लागल्याने मेंदू बाहेर आल्याचे सांगण्यात येते आहे. शाहनवाज मुलाणी हे बारामती लाईव्ह मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत होते. तर ते न्यूज नेशन्स म्हणून डिजिटल मिडिया चालवत होते. दिवसाढवळ्या एका पत्रकाराचा खून झाल्याने येरवड्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास रवींद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस ठाणे हे करित आहेत.