एम.आय.एम ला बी टीम म्हणणारेच भाजपामध्ये सत्तेच्या लालसा पोटी जात आहे. मग ते आता कोणत्या टीमचे?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
लोकसभेचे बिगुल वाजले असून आरोप प्रत्यारोपांची तोफ डागायला सुरूवात झाली आहे. भाजप, कॉग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम ने आपापले उमेदवार जाहीर करून अर्ज जमा केले असून आता प्रचार सुरू झाला असताना एम.आय.एम चे उमेदवार अनिस सुंडके यांनी एम.आय.एम.ला ( AIMIM) बी टीम म्हणणाऱ्यांना चिमटा काढला आहे.
अनिस सुंडके म्हणाले कोणीही उठसूठ एम.आय.एम.पक्षाला भाजपाची बीटीम म्हणून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्या मुळे जनसामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
AIMIM चे बॅरिस्टर असुददीन औवेसी यांनी भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर वारंवार तोफ डागली आहे. तसेच एम.आय.एम. पक्षाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.हे त्या पक्षांच्या पोटात दुखत असल्याने सर्व सामान्यांची दिशाभूल करण्यासाठी बीटीम म्हणून प्रचार केला जातो आहे.
परंतू जनता सुज्ञ आहे त्यांच्या या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस व बीटीम म्हणणाऱ्या पक्षांनी मग ” ए ” आणि ” सी ” टीम कोण हे पण नागरिकांना सांगावे.असा प्रश्न अनिस सुंडके यांनी विचारला आहे.अनिस सुंडके यांच्या प्रश्नाने आता आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहे.




