विकासाचा जीव एवढा गुदमरला आहे की विकासच दिसानाचा झाला आहे.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
भाजपाने विकास केलंय विकास केलंय असे वारंवार भाजप पदाधिकारी म्हणत असल्याने सध्या विकासाचाच गळा आवळण्यात आल्याने आज पुणेकरांची अवस्था बिकट झाली. आज पुणेकरांना महागाई, नौकरी, वाहतूक कोंडी, अवैध बांधकाम, अतिक्रमण, व इतर समस्या भेडसावत असताना देखील दोन दिवसांपूर्वी पुण्यात आलेले पंतप्रधान यांनी या संदर्भात ” ब्र” शब्द देखील काढलेला नाही.
भाजपा नागरिकांच्या समस्यावर बोलायला तयार नसून फक्त जातीधर्माचा राजकारण करत आहे. भाजप फक्त आणि फक्त फोडाफोडीचे राजकारण करून, भाजपात सामील झालेल्यांचाच विकास करण्यास भर देत असल्याचे चित्र आज पाह्यला मिळत आहे.
AIMIM चे उमेदवार अनिस सुंडके यांचे मोमीनपुरा मध्ये जंगी स्वागत. व्हिडिओ 👇
*”पुणे सिटी टाइम्स” शी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्राम ला 👍लाईक 👉फॉलो ↗शेअर नक्की करा*
विकास ,विकास करत भाजपचा विकास मिस्टर इंडिया सारखं कुठंतरी गायब झाला आहे. असा आरोप एम.आय.एम. ( AIMIM) चे लोकसभा उमेदवार अनिस सुंडके यांनी केला आहे.
जनतेने एम.आय.एम पक्षाला साथ द्यावी. आम्ही पुण्याचा विकास करून कायापालट करून दाखवू, अनिस सुंडके यांनी पुणे सिटी टाईम्सला बोलता मत व्यक्त केले आहे.