पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
कोंढवा येथील सर्वे क्रमांक ५५ मधील ४६.०४ एकर जागेची आलमगीर मशीद कोंढवा बुद्रुक (इनाम) वक्फ सार्वजनिक माहिती देणारे बोर्ड लावताना पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो सर्फराज खान यांना धमकावल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वक्फ बोर्डाने १३ मे रोजी पत्राद्वारे कोंढवा येथील वक्फ जमिनीवर बोर्ड लावण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे अशी लेखी माहिती पोलिसांना दिली होती. वक्फ जमीन ४६.०६ एकर जमिनीवर पसरलेली आहे आणि तिचा सध्याचा बाजार अंदाज शेकडो कोटींमध्ये आहे.
खुसरो खान हे वक्फ बोर्डाचे माहिती फलक लावण्यासाठी दोन पोलिसांसह घटनास्थळी गेले होते, जे खरेदीदारांना वक्फ जमीन खरेदी करण्यापासून दूर राहण्याची चेतावणी चे बोर्ड लावत होते.काही जण घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलिसांसमोर खान यांना धमकावले की मी कोणत्याही वक्फ बोर्डावर विश्वास ठेवत नाही आणि सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोर बोर्ड उखडून टाकू. फेकून दिले,
खान यांच्या फिर्यादीवरून १)सलमान काझी, २)शोएब काझी, ३)अल्ताफ गफूर काझी, ४) शफीक गफूर काझी, ५)रिहान रशीद काझी, ६)शकील मुबारक काझी, ७)अमजद मुबारक काझी आणि इतर सहा जणांविरुद्ध३५३,३५२, ५०४,५०६,१४६,१४७,१४९, नुसार भारतीय दंड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तनेजा आणि भटनागर आणि साईराज डेव्हलपर्स यांनी मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप केली आहे, ते महाराष्ट्र वक्फ बोर्डाने अधिसूचित केलेल्या वक्फ जमिनीतील भूखंड बेकायदेशीरपणे विकत आहेत. बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या जागेवर अधिकृत वक्फ बोर्डाचे बोर्ड लावत असताना, आरोपींनी गोंधळ घातला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.