३ लाख रुपये मोजल्याचा एकाचा दावा.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
पुणे महानगर पालिका आयुक्तांच्या सहिने शिपाई पदाचे बनावट नियुक्ती पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात आजी माजी अधिका-यांचे सह्या असल्याचे बोलले जात आहे.
शिपाई पदासाठी नियुक्ती पत्र घेऊन एक तरूण थेट पालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याच कडे गेल्याने सदरील प्रकार उघडकीस आला आहे.
तसेच नियुक्ती पत्र मिळविण्यासाठी ३ लाख रुपये मोजल्याची ही माहिती समोर आली आहे. बनावट नियुक्ती पत्राचे प्रकरण समोर आल्याने महापालिका प्रशासन अलर्ट झाली आहे. तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
त्या पत्रावर आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या सह्या नसून माजी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल व इतरांचे सह्या असल्याचे समजत आहे. बनावट नियुक्ती पत्राचे प्रकरण समोर आल्याने महापालिका मध्ये चर्चेला उधाण आले आहे.