कोंढव्यातील हजरत अबू हनीफा बहुउद्देशीय हॉल चालवणाऱ्या फ्यूचर फाऊंडेशन संस्थेच्या सचिव विरोधात अध्यक्षाने कोंढवा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करूनही पोलिस राजकीय वरदहस्तला बळी पडत असल्याची चर्चा.!

0
Spread the love

संस्थेच्या अध्यक्षालाच सचिवांनी १ तास कोंडून ठेवल्याचा प्रकार.

फ्यूचर फाऊंडेशन ही संस्था वादाच्या भोऱ्यात सापडली असतानाही पुणे महानगर पालिकेतील समाज विकास उपायुक्त करार रद्द करण्यासाठी कशाची वाट पाहत आहेत?

फ्यूचर फाऊंडेशनच्या सचिव समिना शेख यांने पुणे सिटी टाईम्स विरोधात मानहानी दाखल करण्याची दिली धमकी?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे कोंढव्यातील हजरत अबू हनीफा बहुउद्देशीय हॉल चालवणाऱ्या फ्यूचर फाऊंडेशनच्या सचिवाचा कारनामा पुन्हा एकदा समोर आला आहे. सचिवानेच अध्यक्षाला १ तास डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. हकीकत अशी की, फ्यूचर फाऊंडेशन सोबत पुणे महानगर पालिकेने हजरत अबू हनीफा बहुउद्देशीय हॉल चा ५ वर्षांचा करार केला आहे. करारातील अटी व शर्तीला संस्था बंधनकारक असताना सदरील संस्थेच्या सचिव समीना शेख यांनी अनागोंदी कारभार केल्याचा संस्थेच्या अध्यक्षा यांना कळाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा नाज बागवान यांनी विचारना केली.

परंतु त्याचा उत्तर समीना यांना देता आले नाही. तर सचिव समीना शेख यांनी चार जणांची मिटींग बोलावली, आणि त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नाज बागवान यांचे पती अनवर बागवान यांना सचिवांनी मिटींग मध्ये उभे देखील केले नाही. आणि त्यानंतर नाज बागवान यांना १ तास खोलीत डांबून ठेवल्याची तक्रार अनवर बागवान यांनी पोलिसांकडे केली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे की, संस्थेच्या खात्याच्या गैरवापर करून त्या खात्यात २.५ लाख रूपये असल्याचे म्हटले आहे. असे गंभीर आरोप असताना देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याचे अनवर बागवान यांनी पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.

तर पोलिस राजकीय दबावामुळे गुन्हे दाखल करत नसल्याचे सांगितले. परंतु तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कोण? तो का पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत? तर पुणे सिटी टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार बातमी प्रसिद्ध केली असता, सचिव समीना शेख यांनी फोन करून मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अनागोंदी कारभार बाहेर पडू नये यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न समीना शेख यांनी केला आहे.

तर अधिक माहितीनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात देखील सचिवांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे? संस्थेच्या सचिवांनी गोंधळाची स्थिती निर्माण केली असता व नागरिकांची लूट केली असता? पुणे महानगर पालिकेतील समाज विकास अधिकारी कारवाईसाठी का चालढकल करत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून कारवाईची मागणी कोंढवाकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here