पुण्यातील एकनाथ शिंदे गटाचे समर्थक प्रमोद नाना भानगिंरे पक्ष सोडणार? 

0
Spread the love

 

नाना भानगिंरे पक्ष सोडणार असल्याने शिंदे गटात खळबळ.

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

लोकसभेचे वातावरण तापले असताना पुण्यातील एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे कट्टर समर्थक प्रमोद नाना भानगिंरे हे पक्ष सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भानगिरे नाराज झाल्याने भानगिरे समर्थक बुचकळ्यात पडले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेनेला ( ठाकरे गट) सोडचिठ्ठी देऊन भाजपा सोबत वेगळा संसार सुरू केला तेव्हा पुण्यातून सर्वप्रथम प्रमोद नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत त्यांच्या पक्षाचा दोरा हातावर बांधला होता.

ब्रेकिंग : पुण्यातील शिंदे गटाचे समर्थक प्रमोद नाना भानगिंरे पक्ष सोडणार.?

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेवायला न गेल्याने कारण येत आहे समोर.

दि.२९ एप्रिल २०२४ रोजी पंतप्रधान यांची सभा पुण्यात असताना नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते.परंतु शिंदे हे तेथे जेवायला न गेल्याने नाना भानगिरे यांनी नाराजगी व्यक्त केली.

तसेच यापूर्वीही दोन वेळा जेवणाचे निमंत्रण देऊनही शिंदे तेथे न गेल्याने व काल झालेल्या नसरापूर येथे सभे नंतर दुसऱ्या कार्यकर्त्याच्या घरी गेल्याने, नाना भानगिरे व त्यांच्या समर्थकांनी नाराजगी व्यक्त केल्याने नाना भानगिरे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष टिकून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here