अंदाजे १८ ते १९ लाखांपर्यंत दंड वसूल करून मिळकतीवर बोजा चढविला जाणार?
खड्डा खणन करून तसंच सोडल्याने लहान मुलांचं जिव धोक्यात.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा खुर्द येथील शिवनेरी भागात अवैध बांधकामे चालू असताना शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून लाखो रुपये खिशात टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. शिवनेरी गल्ली नंबर १ पिताश्री आश्रम समोर बांधकाम व्यावसायिक जफर भाई यांनी बांधकामासाठी भलामोठा खड्डा खणला आहे.
सदरील ठिकाणी बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन करून शासनाचा लाखोंचा महसूल ( रॉयल्टी) बुडविण्यात आला आहे. त्या संदर्भात पुणे सिटी टाईम्स ने तहसीलदारांकडे तक्रार केली केली आहे.
तहसील कार्यालयातील अधिकारी म्हणाले सदरील ठिकाणी कोणतीही परवानगी दिलेली नाही, तसेच सदरील खड्ड्याची पाहणी केली असता ईटीएस मोजणी करून अंदाजे १८ ते १९ लाख रुपये गौण खनिज ( रॉयल्टी) वसुली करण्यात येणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत सदरील बांधकाम व्यावसायिकाकडून सक्ती वसुली करून जागेवर बोजा चढविला जाणार आहे.