पाकिस्तानात जा म्हणत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास खडक पोलिसांकडून टाळाटाळ; आरोपी मोकाट तर फिर्यादी हवालदिल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या व पाकिस्तान जा म्हणणाऱ्या विरोधात पोलिसांनी एफ.आय.आर दाखल करायची सोडून, फिर्यादीलाच वारंवार पोलिसांनी हेलपाटे मारायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हकीकत अशी की,काशेवाडी मध्ये राहणारे अजमल खान हे मिक्सर, पंखे दुरूस्ती करण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी अक्षय तुरे राहणार वेललार गल्ली, गणेश पेठ याने जुना पंखा संबधिताकडून खरेदी केला होता.

पंखा विकतानाच त्याची कोणत्याही प्रकारची वॉरंटी नाही,असे म्हणूनच पंखा विकला होता.परंतु अक्षय तुरे ची बायको दोनदा पंखा दुरूस्ती करून नेली होती. पुन्हा तो पंखा चालत नसल्याने अक्षय तुरे याने अजमल खान यांना रात्री २ वाजता फोन करून आई,बहिणीवरून शिवीगाळ केली. व वारंवार जातीवाचक शब्द वापरून पाकिस्तान जा? पोलिसात गेला तरी मला फरक पडत नाही? माझ्यावर ४ केस आहे. आणि तुझ्या बायकोला पैशावर नाचविणयाची ताकद आहे.

असे वारंवार फोनवर बोलला, त्याची कॉल रेकॉर्ड पोलिसांना दाखवले असतानाही खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारी काशेवाडी पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी फक्त टोलवाटोलवी करून, नंतर ५०४,५०६ ची एनसी दाखल करून घेत होते. संबंधित अजमल खान हे म्हटले की, त्याने मुस्लिम समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ करून समस्त मुस्लिम समाजाची बदनामी केली व पाकिस्तान जा, असे म्हणाला असता १५३ अ, गुन्हा दाखल करा. परंतु पोलिसांनी काशेवाडी पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी खडक पोलिस ठाण्यात जायला सांगितले.

जेव्हा अजमल खान हे खडक पोलिस ठाण्यात गेले तेव्हा तेथे पीएसआय खुतवळ भेटले त्यांनी सुध्दा एफ.आय.आर दाखल करून न घेता उडवाउडवीची उत्तरे देऊन परत माघारी पाठविले. एखादा व्यक्ती रात्री २ वाजता आई बहिणीवरून शिवीगाळ करून, जातीवाचक शिवीगाळ करतो आणि पाकिस्तानात जा? म्हणतो अश्या लोकांवर पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का? करत आहेत.

तर खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वातावरण तापण्याची वाट बघत बसले आहेत का? एखाद्या मुस्लिम तरुणाने असे जातीवाचक वक्तव्ये केले असते तर पोलिस यंत्रणा तात्काळ कामाला लागून, त्या तरूणाला तुरूंगात पाठविले असते? खडक पोलिसांनी निष्पक्ष कारवाई करावी असे अजमल खान यांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. तर उद्या पोलिस आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले. आता खडक पोलिसांची भूमिका पाहवी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here