पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
आज वसुली बहाद्दारांच्या गुंडगिरी मुळे लोणी काळभोर परिसरात मटका, जुगार,पत्ते क्लब,वेश्याव्यवसाय जोमाने सुरू झाले असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एका दिवशी कोणाचीतरी घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही? अवैध धंद्यावरून वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आज लोणी काळभोर परिसरात पाहायला मिळत आहे.
दिवसभर राबराब कष्ट करून पैसे जमवलेल्या घरातल्या महिलांना मारहाण करुन ते पैसे दारु, मटका, जुगार मध्ये उडवले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असून पत्ते क्लब, वेश्याव्यवसाय, दारू धंदे वाल्यांचे सध्या सुगीचे दिवस आले आहेत.
एचपी पेट्रोल कंपनी समोर, पुना कोल्ड्रिंक शेजारी,मटका-जुगार धंदा आहे.लोणी काळभोर पोलिस ठाण्यात लाखों रूपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच सुरू आहे.तर वरिष्ठापासून कनिष्ठा पर्यंत सर्वचजण देशी तुपात भिजले असल्याने, हिंदी मधील एक म्हण आठवण झाली आहे.
“साहब की चारो उंगलिया घी मे और सर कढाई में”? मटका वाल्यांचे गुन्हेगारांसोबत देखील घनिष्ठ संबंध असल्याची माहिती पोलिस ठाण्यातील सुत्रांनी दिली आहे.आता पोलिस आयुक्त रितेश कुमार लक्ष घालणार का?