मोठ्या उत्साहात नागरिक अधिकार मंचा तर्फे शिक्षक दिन साजरा;३० पेक्षा जास्त शिक्षकांना पुरस्कार

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

शिक्षक दिननिमित्त नागरिक अधिकार मंच तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कोंढवा खुर्द पारगे नगर येथील सिटी लॉन मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कोंढवा खुर्द भागातले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ३० शिक्षकांना व तसेच दोन शिक्षिका शेहनाझ रफीक सज्जन एंगलो उर्दू हाई स्कूल व मोलेदिना हाई स्कूलचे झिया इम्तियाज शेख यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षक दिना निमित्त प्रमुख पावणे म्हणून भाजपा प्रवक्ते महाराष्ट्र राज्य अली भाई दारूवाला, तज्ञ सदस्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्राध्यापक आसमा शेख पटेल व तसेच उद्योग पती नानासाहेब पारगे,भाजपा युवा नेते इसाक भाई पानसरे कुमार सब्लाईम सोसायटीचे चेअरमन शब्बीर सय्यद,अफ्रीन पठाण,

अजित सायमन,मूनाफ शेख,शरिफा सय्यद,शकुर सय्यद, खलिल अहमद, आसिफ शेख,मिसेस पठाण,शाफीन शेख व आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळेस समीर शफी पठाण म्हणाले कोंढवा खुर्द भागामध्ये मोठया प्रमाणावर शिक्षक वर्ग राहतो आणि ज्या शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात उललेखनीय काम करुन समाजातील विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांचा भविष्य उज्ज्वल केले असे शिक्षकांना निवडून त्यांना सन्मानित करण्याची संधी आम्हाला मिळाली व या कार्यक्रमामध्ये मोठया प्रमाणावर शिक्षक शिक्षिका सहभागी झाले त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात मुजाहीद खान, तोसिफ मुजावर,इम्रान जमादार,रियाझ बागवान,फेरोज खान,समीर शेख, मुबारक शेख,रिझवान सय्यद,वाहिद सज्जन, अजजू मुनशी,मुजाहिद रायली, विकास गायकवाड, आसिफ खान,शेहबाझ शेख, अशरफ शेख,इम्रान भाईजान,अक्षय कामठे, शाहिद पठाण,अफान शेख, शादाब शेख यांनी योगदान दिले आणि कार्यक्रमाचे सूत्र संचालन तकदीर रशीद सय्यद सर यांनी केले तर आभार निखिल रोकडे यांनी मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here