सहकारनगर परिसरामध्ये मेफेड्रॉन MD अंमली पदार्थाची तस्करी करणा-याला अटक, लाखोंचा मेफेड्रॉन जप्त

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

सहकारनगर परिसरामध्ये मेफेड्रॉन MD अंमली पदार्थाची तस्करी करणा-याला अटक करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर बातमी मिळाली एकजण अप्पु – गप्पु नर्सरी समोर, क्रांतीसुर्य,महात्मा ज्योतीबा फुले चौक, राऊत बाग,धनकवडी, येथे अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे.

सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन एका संशईत ताब्यात घेतले असता, रोहन काळुराम खुडे, वय-२६ वर्षे, रा.स.नं.३७/१५,भांबरे संस्कृती भवन शाळे समोर, पर्वती दर्शन, पुणे याचे ताब्यात एकुण १ लाख‌ ४ हजार ५५० रुपये किंमतीचा ६ ग्रॅम ९७० मिली ग्रॅम एम.डी.अंमली पदार्थ अनाधिकाराने,बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला.

त्यांचे विरुध्द सहकारनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२१३/२०२२, एन.डी. पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची उल्लेखनीय कामिगिरी अंमली पदार्थ विरोधी पथक – १, गुन्हे निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, सचिन माळवे पांडुरंग पवार, विशाल दळवी, मनोज कुमार साळुंके, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here